संगमनेरमध्ये विखे गटाकडून थोरात यांना कडवे आव्हान

अहमदनगर :
नगर जिल्ह्यातील राजकारण म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय कुरघोडीचे रणमैदान, अशीच ओळख या जिल्ह्याची आहे. यंदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे पारंपरिक विरोधक एकमेकांसमोर आव्हान उभे करीत आहेत.

राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी यंदा संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी शहर व तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला मिळालेले दणदणीत बहुमत लक्षात घेऊन ही जागा महायुतीला मिळविण्याचा चंगखासदार विखे यांनी बांधला आहे. त्याबाबत ते वेळोवेळी घोषणा करून काँग्रेसच्या गोटात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात थोरात यांनी विखेंना काटशह देण्यासाठी वेळोवेळी बैठक घेतल्या आहेत. तर, संगमनेरमध्ये विजय संपादन करून नगर जिल्यातील सर्व १२ विधानसभा जागा महायुतीच्या खिशात घालण्याची तयारी विखे पिता-पुत्रांनी केली आहे. मात्र, येथून महायुतीला जागा भाजपला असेल की शिवसेनेला आणि उमेदवार कोण, याबाबतचा संभ्रम कायम आहे. उमेदवार जाहीर झाल्यावरच येथील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*