म्हणून घोडेगावमध्ये कांदा उत्पादक झाले होते आक्रमक

अहमदनगर :
सरासरी ५५ ते ६० रुपये किलोचे भाव सुरु असताना अचानक कांद्याचे लिलाव ३०-४० रुपयांनी सुरु झाल्याने घोडेगाव (ता. नेवासा) येथील बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी लिलाव बंद पडून पुणे-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून याचा निषेध केला.

शेतकरी आक्रमक झाल्याने बाजार समिती प्रशासन, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक होऊन अखेर पुन्हा कांदा लिलाव सुरळीत झाले. शनिवारी घोडेगाव उपबाजार आवारात सुमारे दोनशे कांदा ट्रकची अवाक झाली. जास्त अवाक झाल्यानेव परराज्यातील भाव पडल्याचे कारण सांगून अडत्यांनी कमी भावात लिलाव केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. अखेरी या बाजारात कांद्याला ३५ ते ५० रुपये असा सरासरी भाव मिळाला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*