शरद पवारांनी व्यक्त केले सातारकरांचे ऋण

सातारा :

राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो. मात्र, आता पक्षांतरामुळे येथील राष्ट्रवादी कितपत शक्तिशाली राहिली हे जोखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार आज येऊन गेले.

त्यांच्या सभेला जोरदारपणे प्रतिसाद देत सातारकरांनी अजूनही पवार साहेबांवरील प्रेम व्यक्त केल्याची भावना राष्ट्रवादीची आहे. शरद पवार यांनीही त्याबद्दल ट्विट करून ऋण व्यक्त केले आहेत.

पवारांनी म्हटले आहे की, “मला सातारकरांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायचे आहेत. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी मोठ्या जल्लोषात माझे स्वागत केले. सातारा जिल्ह्याने नेहमीच देशाच्या हितासाठी काम केले. सातारला स्वातंत्र्यलढ्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी इथे प्राणाची आहुती दिली आहे.”

https://t.co/APxIPqPmT2

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*