
सातारा :
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिल्यास निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेईल. साहेब उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असे सांगत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना भावुक होत राजेंनी आपली भूमिका मंडळी. ते म्हणाले की, शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी.
कॉलर उडविण्याच्या स्टाईलबद्दल बोलताना ते म्हणाले की, माझी स्टाईल हा माझा खासगी प्रश्न आहे. माझी कॉलर मी चावेन नाहीतर फाडून टाकेन. कोणालाही त्याच्याशी काय देणेघेणे असायला नको.
Be the first to comment