तर बलात्काऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या : उदयनराजे

सातारा :
माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राजेशाहीच्या मुद्यावर टीका होत आहे. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, राजेशाही असती तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी करणार असल्यास माघार घेण्याची तयारी दाखविली आहे. ते म्हणाले की, शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन. विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे. उगाच कोणाचीही टीका ऐकून घ्यायला आपण काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*