शिवस्मारक घोटाळ्याची प्रेस ब्लॅकआउट केली; सावंत यांचा आरोप

पुणे :
शिवस्मारक उभारण्यासाठीच्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेत केला होता. ती प्रेस कॉन्फरन्स वृत्तवाहिन्यांनी दाखविली नाही. उलट सरकारच्या आदेशाने प्रेस ब्लॅकआउट केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

ट्विट करून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यावर अनेकांनी उलट-सुलट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज शिवस्मारक घोटाळ्यावरील आमच्या पत्रकार परिषदेला सरकार अडचणीत येत असल्याने (सरकारच्या इशाऱ्यावर) काही चॅनेलकडून ब्लॅक आऊट करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर येणारा अनुभव राज्यातही आला! लोकशाही जिंदाबाद!”

त्यावर प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे की, साहेब जनते मध्ये हा मुद्दा घेऊन या, 💪🙏 मग कुणाला पळून जायचं ते जाऊद्या जनता या फेकुला नक्कीच जागा दाखवेल…… परिवर्तन अटल आहे.

तर, ऋग्वेद कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, १.कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही हा माध्यमांचा सर्वाधिकार आहे.. २.राज ठाकरे पण विरोधक आहेत, शरद पवार पण आहे त्यांना माध्यमे सतत कव्हरेज देतात.. ३. ना तुमच्या भाषणात दम ना आरोपात दम ना सादरीकरणात…मग का दाखवतील माध्यमे त्यांना TRP हवा असतो..तुम्हाला कोणीही विचारात नाही…

मयूर मानकर यावर म्हणतात की, हा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरा, या मुद्यात तथ्य आहे हे लोकांना पटवून द्या. भाजप विरोधात असताना छोट्या छोट्या मुद्द्यांवरून रस्त्यावर आक्रोश करायचं, एकही काँग्रेसी रस्त्यावर यायचे कष्ट घेत नाही. बसल्या जागी सगळं आयतं हवंय सगळ्यांना!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*