फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. काळे यांना उमेदवारी

औरंगाबाद :
शहराच्या लागत असलेल्या सर्वाधिक चर्चेतील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

येथून ते भाजपचे नेते व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात उमेदवारी करणार आहेत. मात्र, बागडे यांच्या ज्येष्ठत्वामुळे त्यांना येथून भाजप पुन्हा संधी देणार, की नवा भिडू मैदानात उतरविणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये या विधानसभा मतदारसंघातून डॉ. काळे यांचा निसटता पराभव झाला होता. बागडे यांना विजय मिळाल्याने व त्यांचे वाढते वय लक्षात घेऊन येथील अनेक इच्छुकांनी भाजपमध्ये जाऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*