उमेदवारी देण्यात शिवसेनेची भाजपवर आघाडी; पहा कोणाला मिळाले एबी फॉर्म

मुंबई :
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटतो की नाही, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपने अजूनही युतीचे अधिकृत गणित मांडलेले नाही. अशावेळी शिवसेनेने मात्र उमेदवारी जाहीर करीत थेट एबी फॉर्मचे वाटप करीत भाजपवर आघाडी घेतली आहे.

आता या जागावाटपावर भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या यादीत संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ), कोकणात उदय सामंत (रत्नागिरी), सदानंद चव्हाण (चिपळूण), राजन साळवी (राजापूर), दीपक केसरकर (सावंतवाडी), भास्कर जाधव (गुहागर) या विद्यमान आमदारांना तर दापोलीतून रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम (दापोली) यांना संधी देण्यात आली आहे.

एबी फॉर्म मिळालेले अन्य नेते पुढीलप्रमाणे : १. भरत गोगावले (महाड), २. वैभव पाटील (कुडाळ), ३. संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम), ४. संतोष बांगर (कळमनुरी), ५. संजय राठोड (दिग्रस), ६. राहुल पाटील (परभणी), ७.शशिकांत खेडकर (सिंदखेडराजा), ८.संजय रायमूलकर (मेहकर), ९.राजाभाऊ वाजे (सिन्नर), १०. अनिल कदम (निफाड), ११. योगेश घोलप (देवळाली), १२. दादा भुसे (मालेगाव बाह्य)
१३. ज्ञानराज चौगुले (उमरगा), १४. नितीन देशमुख ( बाळापूर), १५. यामिनी जाधव (भायखाळा) आदी.

यातील बहुतेक नेत्यांनी सोशल मीडियावर एबी फॉर्म मिळाल्याचे फोटो शेअर केलेले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*