‘लोकरंग मेगामार्ट’तर्फे ‘फ्री होम डिलिव्हरी’; बचत गट उत्पादित शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला पैशापेक्षा जास्त महत्व आले आहे. हा सामाजिक बदल लक्षात घेऊन आणि अहमदनगर शहरामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लोकरंग कॉर्पोरेशन संस्थेने ‘फ्री होम डिलिव्हरी’ सेवा सुरू केली आहे. महिला बचत गट व शेतकरी गटांनी उत्पादित केलेला माल आणि ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादित मालासह रोजच्या वापराचा किराणा नगरमधील ग्राहकांना घरपोहोच देण्यात येतो. 9551915050 या मोबाईल क्रमांवर व्हाट्सअप नंबरला यादी पाठवून दिल्यावर कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने नगर शहरामधील ग्राहकांना ‘फ्री होम डिलिव्हरी’ सेवेचा लाभ घेता येतो.

लेखक : माधुरी सचिन चोभे, अध्यक्षा, लोकरंग कॉर्पोरेशन

महिला बचत गट व शेतकरी गट यांच्यासाठी आमचे लोकरंग फाउंडेशन २०१० पासून काम करीत आहे. मागील आठ वर्षांमध्ये आमच्या संस्थेने नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक महिला, तरुण व शेतकरी यांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व शक्य ते सहकार्य केले आहे. त्यावेळी अनेकांनी आम्हाला मार्केटिंग जमत नाही. माल तयार करू पण विकणार कुठे आणि कसा, असे प्रश्न विचारले. तेंव्हापासून अशा पद्धतीने महिला बचत गट, शेतकरी गट व ग्रामीण भागातील उद्योजकांच्या मालाला हक्काची बाजरपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काहीतरी ठोस काम करण्याचे मनात होते. मात्र, त्याला काही निश्चित दिशा व मार्ग सापडत नव्हता. मात्र, नगर जिल्ह्यामधील काही तरुणांनी यासाठी मदत करून हे काम पुढे नेण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्याने दिशा सापडली. त्यानुसार नगर शहरात पहिले गावरान उत्पादनांची विक्री करणारे मेगामार्ट दालन २८ जुलै २०१९ रोजी सुरू करण्यात आले.

राज्यभरात या मेगामार्ट दुकानांची साखळी वाढविण्याचा आमचा विचार आहे. सोलापूर, पुणे व नाशिक येथून त्याबाबत विचारणा केली जात आहे. मात्र, होतकरू व प्रामाणिक तरुण-तरुणी यांना जोडून घेऊन महिला बचत गट व शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही अशा फ्रॅन्चाइसी घेऊन इच्छिणाऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेत आहोत. यातील काहीजण होतकरू व प्रामाणिक आहेत. त्यांच्याबरोबर फ्रॅन्चाइसी सिस्टीम पुढे वाढविण्यात येणार आहे. तसेच राज्यभरातील महिला बचत गट, शेतकरी गट व कंपन्या आणि ग्रामीण भागातील उद्योजक आमच्याशी नव्याने जोडले जात आहेत. अनेकांनी आतापर्यंत आपले प्रोडक्ट सॅम्पल पाठवून देऊन कामही सुरू केले आहे. तर, काहीजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कुरडया-पापड्या याच्याही पुढे जाऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लोकरंगने ही चळवळ सुरू केली आहे. नगर शहरातील हा प्रयोग यशस्वी होत आहे. त्यामुळेच नगर जिल्ह्यात तालुक्याची ठिकाणे व मोठी बाजपेठेची गावे यामध्ये लोकरंग फ्रॅन्चाइसी देण्यासाठीची तयारी केलेली आहे. महिला बचत गट किंवा शेतकरी गट यांना फ्रॅन्चाइसी देण्यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे.

शेतात उत्पादित केलेल्या डाळी, अन्नधान्य, कडधान्य, लोणचे, पापड, इन्स्टंट रेडी मिक्स (ढोकळा, इडली आदी), झाडू, बिस्किटे, नाचणी सत्व, गूळ, सेंद्रिय उत्पादने यांच्यासह किराणा दुकानांमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आम्ही बचत गटांकडून प्राधान्याने घेत आहोत. तसेच शहरातील ग्राहकांना घरपोहोच डिलिव्हरी देण्याच्या सेवेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अहमदनगर शहरामधील नालेगाव येथे वीर गोगादेव मंदिराच्या चौकात लोकरंग मेगामार्ट सेवा सुरू झालेली आहे. सध्या दशहरा-दिवाळीच्या धामधुमीत शहरी ग्राहक जोडला जात आहे. विशेष म्हणजे महिलांचा या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*