युतीच्या गोंधळात अडकली भाजपची यादी..!

मुंबई :
शिवसेनेसोबत युती होणार की नाही याचे त्रांगडे कायम असतानाच उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म वाटप करून भाजपला शह दिला आहे. अशावेळी जोरदार इनकमिंग झाल्याने कोणाचे तिकीट कापायचे आणि कोणाला द्यायचे याचाही गोंधळ भाजपला सोडविता आलेला नाही. परिणामी या गोंधळात भाजपाची उमेदवारी यादी अडकून पडली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन पक्षवाढीला हातभार लावण्याचे धोरण केंद्रीय कार्यकारिणीचे आहे. मात्र, त्यामुळे जुने निष्ठावान दुखावले जात आहेत. ही डोकेदुखी समोर असतानाच युतीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यातच नव्याने आलेले इच्छुक आणि जुन्यांचा मेळबसवून उमेदवारी कशी द्यायची याचे त्रांगडे भाजपपुढे निर्माण झालेले आहे. परिणामी त्यांची पहिली उमेदवार यादी अडकून पडली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*