राष्ट्रवादीला धोबीपछाड; भाजपने उमेदवार पळविला..!

बीड :
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविलेल्या भाजपने यंदा अगोदरच आमदार फोडण्यात यश मिळविले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मागच्याच कित्ता गिरवत भाजपने राष्ट्रवादीच्या केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना पक्षात घेण्यामध्ये यश मिळविले आहे. राष्ट्रवादीला भाजपने धोबीपछाड दिल्याची यानिमित्ताने चर्चा सुरू आहे.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातून पाच उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामधील केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*