कोपरगावमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली; वहाडणे यांचा अर्ज दाखल

अहमदनगर :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार स्नेहलता कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, येथील भाजपचे निष्ठावंत व नरेंद्र मोदी आर्मीचे नेते नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत वहाडणे यांनी प्रतिस्पर्धी कोल्हे गटाच्या उमेदवारांवर तब्बल साडे एकोणाविस हजाराचे मताधिक्य मिळवून विक्रमी विजय मिळवला होता. त्यांनंतर त्यांनी तालुका व मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत काळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशावेळी येथील तिरंगी लढतीत कोण विजयी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*