वंचित विधानसभा रिंगणात; २८८ जागा लढविणार

मुंबई :
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदानाची टक्केवारी कमी करून १३ ठिकाणी आघाडीच्या पराभवास कारण ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविण्याची तयारी केली आहे. सर्व २८८ ठिकाणी उमेदवार देऊन राज्यात वंचितांचे सरकार आणण्याची घोषणा नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी निवडणूक स्वबळावर व ताकदीने लढविण्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, राज्यातील आमचा एकमेव पक्ष असेल, जो सर्व २८८ ठिकाणी उमेदवार देणार आहे. निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन वंचितांची सत्ता येईल. त्यावेळी रायगडावर आमचे नवीन मंत्रिमंडळ शपथविधी घेईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*