चंद्रकांत दादांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक

पुणे :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच ही बातमी फुटल्याने आता त्यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्र घेत उमेदवारीला विरोध केला आहे.

महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून भूमिका मांडली आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलून कोल्हापूर येथील चंद्रकांत पाटील येथून उमेदवारी करीत असल्याने त्याचा निषेध करतानाच पाटील यांना ब्राह्मण द्वेष्टा ठरावीत महासंघाने टीका केली आहे. ब्राह्मण समाजातील व्यक्तीला येथून उमेदवारी देण्याची मागणी महासंघाने केली आहे. आता भाजप यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महासंघाला नेमका कोण ताकद देऊन विरोध करण्यास भाग पाडीत आहे, याबद्दलही शंका उपस्थित होत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*