भाजपची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांसह खेळाडूंना यादीत स्थान

दिल्ली :
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादी जाहीर करण्यास भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने सुरुवात केली आहे. हरियाणा राज्यातील पहिली यादी जाहीर करताना त्यात ७८ जणांना स्थान देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना करनाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपमध्ये प्रवेश केलेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, हिंदुस्थानच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग, महिला कुस्ती खेळाडू बबिता फोगट यांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. योगेश्वरला बरोदा, संदीप सिंगला पेहोवा आणि फोगाटला दर्डी मतदारसंघामधून उमेदवारी मिळाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*