मंदीचा झटका; बजाज ऑटोच्या विक्रीत २० % घट

मुंबई :
आर्थिक मंदीचा झटका ऑटो सेक्टरसह इतरही सर्व क्षेत्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बजाज ऑटो कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये २० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

देशात सर्व काही चांगले चालले असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार जगाला देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तसे चित्र वास्तवात कधी येणार, अशीच शंका निर्माण करणारे आकडे आर्थिक क्षेत्रातून पुन्हापुन्हा जाहीर होताना दिसतात. सध्या बजाज ऑटो या कंपनीला मंदीचा झटका बसला आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत ३१ टक्के, तर निर्यातीमध्ये २ टक्के घट नोंदविण्यात आलेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*