राजळेंची उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

अहमदनगर :
भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पक्षांतर्गत बंडखोरीची शक्यता वाढली आहे.

बंडखोरांचा धोका असतानाही भाजपने राजळे यांनाच उमेदवारी दिल्याने बंडखोरांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे नेतृत्व कोण करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बंडखोरांना शांत केल्यास येथून भाजप-राष्ट्रवादी अशीच एकासएक लढत होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*