भाजपमध्ये आले आणि दोन्ही छत्रपतींचे सूर जुळले..!

सातारा :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोघांमधून विस्तवही जात नसे. मात्र, आता दोघेही भाजपत आल्यानंतर दोघांची झालेली दिलजमाई सातारकरांची चर्चेचा विषय बनली आहे.

दोन्ही छत्रपतींच्या पेजवर एकतरी फोटो झळकताना दिसत आहेत. तर आज उमेदवारी अर्ज भारतानेही दोघांनी एकतरी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही छत्रपती कधीतरी एकत्र येत. निवडणुकीत एकत्र येणारे हे दोन्ही भाऊ नंतर एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे डाव खेळताना दिसत. आताही भाजपत आल्यावर आपल्या विरोधात निवडणूक लढलेल्या नरेंद्र पाटील यांच्याच मिशा बेस्ट असल्याचा दाखल देऊन उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना कोपरखळी मारली होती. मात्र, आता लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत दोन्ही छत्रपतींचे सूर जुळले आहेत. ते किती दिवस टिकतात, यावरच साताऱ्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा परिणाम नाही ना..?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकताच सातारा येथे मेळावा घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मंडळी होती. त्यावेळी नाव न घेता पवार यांनी उदयनराजे यांना टीकात्मक कोपरखळ्या मारल्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यास मोठी गर्दी उसळली होती. तसेच सातारा शहर व नजीकच्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्याचाच धसका घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही भावंडांना एकत्रीतपणे निवडणुकीस सामोरे जाण्याची मार्गदर्शक सूचना तर केली नाही ना, याचीही चर्चा शहरात सुरू आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*