संगमनेरमधून भाजपचे पीछेमूड; विखे गटाचीही माघार

अहमदनगर :
संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. यंदा याच बालेकिल्ल्यात थोरातांना धोबीपछाड देण्याच्या घोषणा करीत भाजपच्या विखे गटाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात येथून भाजपसह विखे गटानेही माघार घेत मतदारसंघ शिवसेनेला देऊन टाकला आहे.

नगर जिल्ह्यात यंदा महायुती १२:० फरकाने निर्भेळ विजय मिळवणार असल्याच्या घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या आहेत. त्यानुसार भाजपकडून उमेदवारी यादीत बदल करण्याचे प्रयत्न विखे गटाने केलेही. मात्र, त्यात त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याची चर्चा आहे. संगमनेर येथून भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचे विखे गटाने वेळोवेळी म्हटले आहे. मात्र, युतीच्या जागावाटपात येथून शिवसेना उमेदवार निवडणूक लढविणार आहे. आता त्याला विखे कधी ताकद देतात यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*