राज्यात मोदींच्या १०, तर शाह यांच्या २० सभा होणार..!

मुंबई :
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात मित्रपक्षांच्या मदतीने एकहाती सत्ता मिळविण्यासाठीची तयारी भाजपने केली आहे. त्यानुसार राज्यात पुढील १८ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या २० सभांचे नियोजन करण्यात येत आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी सर्व मार्गाने लढणाऱ्या भाजपने आता नाही तर कधीच नाही, या न्यायाने महाराष्ट्रात प्रचाराचे नियोजन केले आहे. एकहाती सत्ता मिळविण्याची ही संधी असल्याचे भाजप धुरीणांचे म्हणणे आहे. त्यानुसार केंद्रीय कार्यकारिणीने भाजपच्या प्रचाराची दिशा ३७० व केंद्र सरकारमुळे परदेशात देशाची पत वाढल्याच्या मुद्दयांवर फोकस करून महाराष्ट्रात प्रचार सुरू केला आहे. कांदा व इतर शेती-ग्रामीण भागाचे प्रश्न विसरून मतदान करण्यासाठी मतदारांना प्रेरित करण्याचे धोरण ठेऊन मोदी-शाह यांच्या ३० सभांचे नियोजन केले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*