अखेर मुंडे गटाच्या संगीत ठोंबरे यांना केजमध्ये उमेदवारी नाही..!

बीड :
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात भाजप पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासह पक्ष वाढविला. राष्ट्रवादीने वेळोवेळी त्यात फोडाफोडी करून मुंडे गटाला प्रतिआव्हान दिले. मात्र, आता भाजपने राष्ट्रवादीतून उमेदवार पळवून आणून केजमध्ये निष्ठावंत आमदार संगीत ठोंबरे यांना उमेदवारी नाकारली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्याच गटाच्या निष्ठावंत महिला आमदाराला उमेदवारी न दिल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*