कराड दक्षिणमध्ये चव्हाण-भोसले भिडणार; आज उमेदवारी दाखल होणार

सातारा :
जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची लढत म्हणून कराड दक्षिणकडे पहिले जात आहे. येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध महायुतीचे अतुल भोसले एकमेकांना भिडणार आहेत.

कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार व राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची कराड येथे विजयी संकल्प रॅली व प्रचार सभाही होणार आहे. चव्हाण गुरुवारी सकाळी अकरा वाजता कराडमधील नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*