मनसैनिक नितीन नांदगावकर शिवसेनेत

मुंबई :
समाज माध्यमांचा सर्वात चांगला वापर करून तळागाळात पोहोचलेल्या नितीन नांदगावकर या मनसैनिकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अनेक वेळा नितीन नांदगावकर हे आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न सोडवताना दिसले असतील. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीसपदी ते कार्यरत होते. त्यांची काम करण्याची पद्धतीमुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फेसबुक वर आजही त्यांचा वैयक्तिक नंबर असून तुम्ही 24 तासात कधीही फोन करा मी तुमच्या सोबत असेल असेही ते म्हणतात. नितीन नांदगावकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह आहेत पण अधिकार असतानाही इतर पुढारी, अधिकारी जे करू शकत नाहीत ते नांदगावकर करतात. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.मनसेने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. नितीन नांदगावकर यांना मुंबईतून उमेदवारी मिळेल अशी समजले जात होते. मात्र दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने नांदगावकरांनी सेनेचा रस्ता धरल्याचं अंदाज आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*