या उमेदवाराच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल तीनशे कोटींची वाढ..!

मुंबई :
मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत तब्बल ३०० कोटी रुपयांची वाढ झालेली आहे.

हा उमेदवार गेली दहा वर्षे आमदार आहे. मुंबई मधील प्रसिद्ध बिल्डर म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 मध्ये उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 200 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. 2009 च्या विधासभेला त्यांची संपत्ती 68 कोटी एवढी होती. नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 500 कोटी आहे. स्वतःच्या नावावर 131 कोटी 66 लाखांची, पत्नीच्या नावावर 110 कोटी 71 लाख तर एकत्र कुटुंबाच्या नावावर 10 कोटी 22 लाख अशी 252 कोटी 59 लाख रुपयांची जंगम तर 229 कोटी 37 लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जवळपास 500 कोटींचे मालक असलेल्या या उमेदवाराकडे एकच 14 लाखांची जॅग्वार गाडी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हे उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आहेत. काल मलबार हिल मतदार संघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*