संजीव भोर लवकरच जाहीर करणार राजकीय भूमिका..!

अहमदनगर :

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक व शिवप्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संजीव भोर आपली राजकीय भूमिका ७ ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरावर जाहीर करणार आहेत.

शिवप्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भोर यांचे राज्यातील काही निवडक समर्थक,सहकाऱ्यांची नुकतीच अहमदनगर येथे बैठक संपन्न झाली. कोपर्डी अत्याचार प्रकरणाला वाचा फोडण्यात, तसेच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात संजीव भोर यांनी प्रमुख भूमिका पार पाडलेली आहे. मागील 18 ते 20 वर्षांपासून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळीत योगदान देणारे संजीव भोर हे एक आक्रमक लढवय्या चेहरा म्हणून त्यांचे नाव सर्वपरिचित आहे.

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभर भोर यांना मानणारा वर्ग आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षण आंदोलनात राजकीय तटस्थता बाळगून आंदोलनाला योग्य दिशेने नेण्यासाठी संजीव भोर यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मराठा नेत्यांमध्ये संजीव भोर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांचे स्वरूप ठरविण्यात,तसेच या मागण्या सरकार दरबारी व माध्यमांपुढे प्रभावीपणे मांणण्याचे काम संजीव भोर यांनी केले आहे.कोपर्डी अत्याचार घटनेनंतर जनप्रक्षोभ उसळल्यामुळे सरकारकडून संजीव भोर यांना विविध कारणांनी लक्ष्यही करण्यात आले होते.

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कोपर्डी ग्रामस्थांनी संजीव भोर यांचा कोपर्डी गावात सत्कार करून भोर यांनी या प्रकरणावर आवाज उठवण्यासाठी दिलेल्या योगदानाची पावतीच दिली होती. महिला भगिणींवरील अन्याय-अत्याचारा विरोधात,तसेच मराठा आरक्षण प्रश्न, शेतकरी संपात व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेकडो आंदोलने करणाऱ्या भोर यांची राजकीय भूमिका निश्चितच महत्वाची आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर संजीव भोर व त्यांच्या समर्थकांनी राजकीय भूमिकेबाबत अलिप्तता बाळगलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांतील काही प्रमुख समर्थकांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीवर गांभीर्यपूर्वक विचारमंथन झाले. सत्ताधारी पक्षांच्या प्रवाहात सामील व्हायचे की विरोधकांच्या प्रवाहा विरोधातील संघर्षाचा मार्ग पत्करायचा,की यापुढेही राजकीय तटस्थता बाळगायची या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. वैचारीकता व व्यापक समाजहित समोर ठेवून राजकीय भूमिका घेण्याबाबत बैठकीत सर्व संमतीने निर्णय घेण्यात आला आहे.घेतला जाणारा निर्णय राज्यस्तरीय कार्यक्रमातून जाहीर करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीसाठी नगर व इतर जिल्ह्यातून संजीव भोर, सचिन चौगुले, मदन मोकाटे, प्रशांत इंगळे, अंकत चव्हाण, निलेश मदन, कैलास आवारी, अनिल बोटे, प्रदीप देसाई, स्वप्नील नागटिळक, दत्ता जाधव, तुषार गायकवाड, तेजस पाटील, भरत ढाळे, उत्तम पवार, विजयराज भोसले, अमोल पाठक, जिजा कचकुरे, तोहीद पिरजादे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*