लढण्याऐवजी आमदार जगतापांची तालावर म्यान; राष्ट्रवादी उमेदवाराच्या शोधात

अहमदनगर : मतदारसंघात वेळ न दिल्यास व विकासकामे करण्यात कमी पडल्यास ऐनवेळी कशा पद्धतीने निवडणुकीत माघार घ्यावी लागते, याचा अनुभव श्रीगोंदा येथील आमदार राहुल जगताप यांनी घेतला आहे. त्यांनी माघारीची तयारी केल्याने ऐनवेळेस राष्ट्रवादी भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी वैयक्तिक अडचणींमुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. मात्र, ते कारण स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँगेसकडून ऐनवेळी कुणाला उमेदवारी दिली जाईल याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ऐनवेळी आता जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे या देखील उमेदवारी अर्ज भरू शकतात अशी चर्चा आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*