संजय राऊत यांचे ‘आरे ला कारे’; पहा काय म्हणाले ते..!

मुंबई :

मुंबईत आरे जंगलात असलेली निसर्गसंपदा मेट्रो कारशेडमुळे धोक्यात येण्याची भीती आहे. हेच जंगल तोडण्याचे काम सुरू असल्याने शिवसेनेचे नेते, खासदार व सामना दैनिकाचे संपादक संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईत सध्या आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध करणारे आंदोलन जोरात असतानाच मध्यरात्री येथील झाडांची कत्तल करण्यात आली. न्यायालयात याप्रकरणी राज्य सरकारने आरे हे जंगल नसल्याची भूमिका मांडली होती. तोच धागा पकडून राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*