वादळी पावसाने फळबागांचे प्रचंड नुकसान!

परभणी (आनंद ढोणे) :

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काल परवा परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनने जोरदार तडाखा देत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने संत्रा, मौसंबी,लिंबोनी झाडांची फळे पावसाने झोडपून गळून पडली आहेत.

जोराच्या वा-यासह पावसात मोठमोठी झाडे देखील उन्मळून पडलीत तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तसेच कापूस पीकाची झाडे वा-याने वाकून मोडली आहेत. वसमत तालूक्यातील लोण खू शिवारातील मौसंबी फळांची प्रचंड प्रमाणावर पडझड झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. यंदा वरुन राजाच्या कृपा दृष्टीने कोरडा दुष्काळ हद्दपार होवून खरीपासहच पुढे रब्बी हंगामातील पीके शुध्दा जोमदार येणार आहेत. सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सर्वच ठिकाणच्या शेतशिवारातील नदी नाले, विहीर बोअरवेल तुडूंब भरुन भरुन आहेत. मात्र कालच्या पावसाने फळबागा आणि खरीप पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. ब-याच गावच्या शिवारात कापणीला आलेले सोयाबीन पीकाचेही नूकसान होत आहे. या सर्व पीकाची तात्काळ पाहणी करुन पीक विमा भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*