सेनेच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस; पहा काय आहे जाहीरनामा..

मुंबई :

मुख्यमंत्रीपद मिळविण्याच्या इर्षेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या शिवसेना पक्षाने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणात भाजपला काटशह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने धर्म, शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

एक रूपयात आरोग्य चाचण्या, दहा रूपयांत सकस आहाराची थाळी, वीज दरकपात, दुर्बल घटकातील मुलींचे विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण अशी विविध आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली. महिला बचत गटांना सामावून घेऊन राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार असल्याचे सांगत पुन्हा एकदा शिवसेनेने झुणका भाकरीचे राजकारण पटलावर अआणले आहे.

अशी आहे वाचानाम्यात घोशानाबाजी :

अल्पभूधारक व दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी थेट दहा हजार रूपये
आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण
राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी
तालुकास्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० बसची विशेष सोय
३०० युनिटपर्यंत : घरगुती वीजदरात तीस टक्के कपात
राज्यातील सर्व खेड्यातील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण
सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल
निराधार पेन्शन योजनेतील मानधन दुप्पट करणार
राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे
गावागावातील धार्मिक स्थळांना अनुदान

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*