मुख्यमंत्री खरं बोलतात हे लिखित द्या : सावंत

मुंबई :

मुंबई दूरदर्शन वाहिनीवर कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर मांडण्यासाठी दिलेल्या वेळेची स्क्रिप्ट दिल्यावर त्यात काही वाक्ये गळण्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षे खोटं बोलत असल्याचा मुद्दा काढून टाकण्याचे सांगण्यात आल्याचा दावा करतानाच असेच जर असेल तर, मुख्यमंत्री खरं बोलत असल्याचे लिखित देण्याचे आवाहन कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

ट्विटरवर पोस्ट टाकताना स्क्रिप्टचे फोटो सावंत यांनी प्रसिद्ध करून निषेध व्यक्त केला आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, “दुरदर्शनवर काँग्रेसने दिलेल्या स्क्रिप्टमधील ” गेल्या ५ वर्षांत मुख्यमंत्र्यांनी थापा मारण्याशिवाय व खोटे बोलण्याशिवाय काही केले नाही” या शब्दांना गाळले गेले. याचा निषेध करुन मी रेकाॅर्डींग करायला नकार दिला. दूरदर्शनने मुख्यमंत्री खरं बोलतात असे लिखित द्यावे ही मागणी मी केली आहे.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*