होय, मोदी हे न्यू इंडियाचे राष्ट्रपिता : फडणवीस

मुंबई :

महात्मा गांधी हे भारताचे आणि आमचे राष्ट्रपिता आहेत आणि यापुढेही असतील मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यू इंडियाचे राष्ट्रपिता आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींवरील विश्वास दृढ असल्याचा संदेश दिला आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाजपची भूमिका सविस्तर मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशी भूमिका मांडून पत्नी अमृता फडणवीस यांच्या मोदी म्हणजे राष्ट्रपिता या विचारांशी आपलीही बांधिलकी व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस, संबित पात्रा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता फडणवीस यांनी मोदींना राष्ट्रपिता ही उपाधी देऊन ऋण व्यक्त केले आहे.

फडणवीस म्हणाले की, जे काम आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात झाले नाहीत, ते महायुती सरकारने फ़क़्त पाच वर्षांत करून दाखवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं कलम 370चा विरोध केला आहे. भाजपाच्या रक्तातच राष्ट्रवाद आहे. त्यामुळे आम्ही 370वर बोलतच राहू. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न नक्कीच पुढील काळात सोडवीत राहू.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*