म्हणून आमदारांना वेशीबाहेर रोखले होते ग्रामस्थांनी..!

सोलापूर :

विधानसभा निवडणूक म्हणजे गावोगावी विकासाचा शब्द देण्या-घेण्याची पर्वणी. मात्र, मागील निवडणुकीत दिलेला शब्द न पाळल्यास मतदार राजा बिथरून जाब विचारण्यास पुढे येत असल्याचे आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्याचीच झलक माढा विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत दिसली होती. हीच घटना सध्या सोलापूर जिल्ह्यात जोरदार व्हायरल केली जात आहे. ईश्वर वठार येथील ही घटना सध्या जिल्ह्यात जोरात ट्रेंडमध्ये आहे. आताचीच ताजी बातमी असल्यागत आमदार बबन शिंदे यांच्या विरोधकांनी ही बातमी व्हायरल केली आहे.

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या पराभवासाठी या मतदारसंघातील सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यातच स्थानिक ग्रामस्थही मागील पंचवीस वर्षांच्या विकासाचा हिशोब मागण्यासाठी पुढे येत असल्याचे या भागात दिसत आहेत. त्याला आधार देण्यासाठी म्हणून कोकाटे यांच्या समर्थकांनी जुन्या बातमीचा आधार घेऊन ही ताजी बातमी असल्याचे सांगत व्हायरल केली आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांची प्रचार रॅली रोखून धरून मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याकडे लक्ष वेधले होते.

विविध स्थानिक वृत्तपत्रांनी याची दखल घेऊन या घटनेला बातम्यांमध्ये स्थान दिले होते. हि घटना पाच वर्षांपूर्वीची आहे. मात्र, त्याचेच फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले जात आहेत. त्यावेळी आमदारांना गावाबाहेर रोखल्याने जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी मध्यस्थी करून गावात प्रवेश मिळण्याचा मार्ग आमदार शिंदे यांना खुला केला होता.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*