अखेर राणे झाले भाजपवासी; ‘स्वाभिमान’ केला विलीन..!

मुंबई :

भाजपकडून खासदारकी मिळूनही भाजपमध्ये पूर्णपणे समरस न झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपवासी होण्यामध्ये अखेर यश आले आहे. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करीत राणे पिता-पुत्र आता खर्या अर्थाने भाजपचे सदस्य बनले आहेत.

कणकवली येथे माजी आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे कुटुंबियांना पक्षात घेतल्याचे म्हटल्याने राणे यांचा जीव भांड्यात पडला आहे. शिवसेना सोडून कॉंग्रेसमार्गे राणे यांनी स्वाभिमान पक्ष बनवून वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न विशेष यशस्वी होताना दिसत नसल्याने राणे यांनी भाजपवासी होत आपले भवितव्य ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*