माणदेशी महिला देशमुखांसाठी उतरल्या प्रचारात..!

सातारा :

माणदेशी भाग म्हणजे दुष्काळी परिस्थिती, असेच चित्र महाराष्ट्रातील जनतेच्या समोर येते. मात्र, हेच चित्र पालटून या भागाला पाणीदार करण्यासाठी अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी ग्रामीण विकासात झोकून देऊन काम केले. त्याचीच पावती म्हणून देशमुख यांचा प्रचार या भागातील महिलांनी सुरू केला आहे.

दहिवडी भागात महिलांच्या ग्रुपने प्रचारात कोणावरही टीका न करता या दुष्काळी भागाच्या विकासासाठी देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन सुरू केले आहे. वर्षा मोरे, सुनिता पवार, वर्षा सावंत, अनिता पवार, रंजना गायकवाड, साधना जाधव, स्वाती फडतरे, राजू साळुंखे, अतुल जाधव, प्रतिक जगदाळे, दिपक साखरे, सुभाष पवार, अमृत ढगे, प्रविण पोळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते या टीममध्ये सहभागी झाले आहेत.

दुष्काळी भागातील शेतीचे प्रश्न सोडविणे व तरुणांच्या हाताला हक्कचा रोजगार देण्यासाठी प्रचारात सहभागी झाल्याचे ही टीम सांगत आहे. एकूणच या भागातील लोकप्रतिनिधींनी विकासकामे करण्यात व लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पावले न उचलल्याचे ग्रामीण महिला व तरुण परिवर्तनाची हाक देत प्रचाराला गती देत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*