राणे या व्यक्तीशी नाही, तर प्रवृत्तीशी लढा : केसरकर

सिंधुदुर्ग :

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सामान्य जनतेला त्रास देतात, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात लढत आहे. मात्र, आता भाजपत आल्यावर कदाचित त्यांच्यात योग्य असा बाल होईल अशी अपेक्षा वाटते. अशा शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे.

पत्रकार परिषदेत त्यांना राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर केसरकर म्हणाले की, अडीच वर्षे भाजपत येण्यासाठी वाट पहावी लागली. दरम्यान त्यांनी स्वाभिमान हा पक्ष स्थापन केला. हाच पक्ष आणि स्वाभिमान त्यांना भाजपमध्ये विसर्जित करावा लागला आहे. भाज्क्प व संघ परिवाराच्या वैचारिक मंथन शिबिरात राणे यांना योग्य तो विचार काय आहे हे समजेल, असाही खोचक टोला केसरकर यांनी लगावला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*