पूरग्रस्तांना मदत मुख्यमंत्र्यांकडून : तेली

सिंधुदुर्ग :

सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यात पूरग्रस्त भागात आलेला सरकारी मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. शिवसेना उमेदवार व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे त्यात कोणतेही श्रेय नसल्याचे सांगून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

परिवर्तन यात्रेमध्ये मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तेली यांनी या भागतील वाढती बेरोजगारी व विकासासाठी निधी कमी मिळत असल्याचे सांगून हा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार पदावर काम करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. तेली म्हणाले की, केसरकर यांनी रुग्णालयाचे उद्घाटन करून फ़क़्त दिखाऊपणा केला आहे. कोणतेही ठोस काम उभे करण्यात त्यांना अपयश आले आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मंत्री केसरकर यांच्या विरोधात एक उमेदवार देण्यात विरोधकांना अपयश आले आहे. येथून राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर हेही रिंगणात आहेत. अशावेळी विरोधी मतदानात झालेली फुट सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, तरीही भाजपने तेली यांच्यामार्फत येथे विजयाची आस ठेऊन प्रचार सुरू ठेवला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*