म्हणून आमदार शिंदेना घरीच बसावा : प्रा. सावंत

सोलापूर :

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी मतदारसंघ व या भागाचा विकास करण्याकडे लक्ष न देता फ़क़्त वैयक्तिक प्रपंच विस्तारला. विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या आमदाराला यंदा जनतेने नक्कीच घरी बसवावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे यांच्यासाठी रासप पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात प्रा. सावंत बोलत होते. यावेळी कोकाटे म्हणाले की, आघाडी सरकारने सगळ्यांना फ़क़्त झुलवत ठेवले. धनगर समाजालाही न्याय दिला नाही. तर, महायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली. आताही पुढील पाच वर्षांमध्ये महायुती सरकारकडून विकासाचे नवे प्रकल्प हाती घेतले जातील. त्याद्वारे माढ्याचा विकास करण्यासाठी महायुती परिवर्तनाची ही लढाई लढत आहे. शिवाजी कांबळे यांनीही येथून यंदा कोकाटे यांचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास सभेत व्यक्त केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*