म्हणून त्या माणदेशी तरुणाने घातले चक्क टेबल चिन्हाचेच कपडे..!

सातारा :

निवडणुकीच्या प्रचारात नेते आणि कार्यकर्ते नवीन शक्कल लढवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार सध्या सोशल मिडीयावर जोरात व्हायरल होत आहे. माण-खटाव भागातील या तरुणाने अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी चक्क त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या टेबल चिन्हाने रंगविलेले कपडे परिधान केलेले आहेत.

माण-खटाव भाग म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेला. राज्यात माणदेशाची हीच ओळख आहे. हीच नकारात्मक ओळख पुसून टाकण्यासाठी यंदा आमचं ठरलंय अशी सर्वपक्षीय टीम देशमुख यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. देशमुख यांनी या भागात ग्रामीण विकासाची चळवळ उभी केली आहे. यापूर्वी काय झाले, यापेक्षा पुढे कोणता विकास करणार यावर ही टीम प्रचारात बोलत असल्याने महिला व तरुण वर्गाचा देशमुख यांना पाठींबा मिळत आहे. त्यातल्याच एका तरुणाने चक्क प्रचारासाठी नवीन शक्कल लढवीत टेबल रंगविलेले कपडे घालून सभा व पदायात्रांना उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. त्याचाच फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*