त्या कारणामुळे ईडीने पाठविली पवारांना नोटीस : फडणवीस

मुंबई :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीजणांना कर्ज देण्याची विनंती करणारे पत्र राज्य सहकारी बँकेला पाठविलेली आहेत. कर्ज देताना त्याचा आधारदेखील बँकेने घेतला आहे. त्याचा काही क्रिमिनल अँगल आहे किंवा नाही हे तपासानंतर सिद्ध होईल. त्याच्याच तपासासाठी म्हणून ईडीने त्यांना नोटीस पाठविली होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत दिली.

ते म्हणाले की, बँकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव करून पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिल्याचे आढळले आहे. अशा काही ठरावांमध्ये पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. पात्रता नसतानाही बँकेनं काही लोकांना कर्ज वाटली. पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु आहे. त्यामुळे त्यांनी नोटीस पाठविली असावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*