बँक घोटाळ्यात रोहित पवारही; सोमय्या यांचा दावा..!

नाशिक :

राज्य सहकारी बँक या शिखर बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेमध्ये संचालक असलेल्या रोहित पवार यांचेही नाव आहे. नाबार्ड, कॅग व रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ही माहिती असल्याचा दावा भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गैरव्यवहार प्रकरणांवर भांडाफोड करीत पत्रकार परिषदा घेणाऱ्या सोमय्या यांनी शिखर बँक घोटाळ्यात आता रोहित पवार यांचे नाव घेतल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. कर्जत-जामखेड (जि. अहमदनगर) येथे भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध रोहित पवार यांनी परिवर्तनाची हाक देत राळ उडवून दिली आहे. अशावेळी ईडीच्या नोटीसमध्ये किंवा कुठेही नाव नसताना आता ऐनवेळी सोमय्या यांनी त्यांचे नाव घेतल्याने याद्वारे पवारांवर राजकीय कुरघोडीचा डाव असल्याचेही म्हटले जात आहे.

अहवालात पवारांचे नाव आल्याने दुःख झाल्याचे सांगत अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या राजीनामा नाट्यामागील खरे कारण उलगडेल असाही दावा सोमय्या यांनी केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*