कर्जत-जामखेडमध्ये रामाचा रावण झाला, त्याचे दहन करणार : मुंडे

अहमदनगर :

दहा वर्षांपूर्वी २००९ मध्ये मीच पक्षाकडे आग्रह धरून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र, हाच राम आता रावण झाला आहे. त्यामुळे मी जाहीर माफी मागतो. त्या रावणाचे दहन करायची वेळ येत्या एकवीस तारखेला आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.

जामखेडच्या बाजारतळावर झालेल्या या सभेत मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे उमेदवार शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, २००९ मध्ये तिकिट वाटपावेळी मीच राजेंद्र गुंड आणि दत्तात्राय वारे या दोघांना डावलून शिंदे यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली होती. दहा वर्षानंतर या भागात आल्यावर माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली होती हे आता जाहीरपणे मान्य करावे लागेल. माझ्यामुळे या भागातील जनतेने जे भोगले, त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत मुंडे यांनी नेहमीच्या स्टाईलने भाजपा सरकारविरोधात टोलेबाजी केली. राज्यातील शेतकऱ्यांना विहिरी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात. मात्र, त्या विहिरी शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेल्याच नाहीत. बहुधा या विहिरी गुप्त असून त्या फक्त भाजपावाल्यांनाच दिसत असाव्यात, असा टोला मुंडेंनी लगावला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*