चौथीच्या पुस्तकातून छ. शिवरायांचा इतिहास पुसला; राज्यभरात संतापाची लाट..!

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मात्र, त्याच शिवरायांचा इतिहास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून पुसला गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने यावर बातमी केल्यानंतर अवघ्या महाताष्ट्रातून याच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

बातमीमध्ये म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाही. केवळ  भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या तत्वांचे राज्य निर्माण करण्याचा प्रचार सध्या सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहे. तरी नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने फारशी तसदी घेतलेली दिसत नाही.

चौथीच्या वर्गाला शिवाजी महाराजांचा इतिहास हा गेली अनेक वर्षे  शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांत काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या वादंगानंतर चौथीच्या पुस्तकांतील शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याबाबत विधिमंडळात ठराव झाला होता. त्यानंतर सरकार बदलले, अभ्यासक्रम बदलले तरी चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि शिवाजी महाराज हे समीकरण कायम राहिले. २०१० मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतानाही चौथीचे इतिहासाचे पुस्तक शिवाजी महाराजांवरच ठेवण्यात आले. पहिल्यांदा १९७० मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर त्याच्या मांडणीत कालानुरूप काही बदल झाले. मात्र चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मूळ गाभा तोच ठेवण्यात आला. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे, याकडेही ल्बातामित लक्ष वेधण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*