साताऱ्यामध्ये पवारांची उद्या जाहीर सभा

सातारा :

सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 18 ऑक्टोबर २०१९) सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होत आहे. त्या सभेत शरद पवार भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासह कोरेगाव विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही प्रचारसभा होत आहे. जिल्हा परिषद मैदानावर हो असलेल्या या सभेत पवार साहेब माजी खासदार उदयनराजे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर काय टीका करणार आणि किती गर्दी होणार, याबद्दल राज्यभरात चर्चा सुरू आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*