म्हणून मोदींच्या विरोधात #BechendraModi ट्रेंड

मुंबई :

हरियाना आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जोरात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ट्विटरवर जोरात ट्रेंड सुरू आहेत. रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर #मोदी_परत_जा हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग होते, तर आता BechendraModi हा ट्रेंड साधा जोरात आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सुरळीत चालू असलेल्या व नफ्यात असलेल्या कंपन्या विकण्याचा किंवा सरकारी शेअर कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या येत असल्याने मोदींच्या विरोधात ट्रेंड सुरू झाला आहे. देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असून उद्योजक मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह या प्रक्रियेत रस घेण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच हा ट्रेंड सुरू झालेला आहे.

https://twitter.com/search?q=%23BechendraModi&src=trend_click&pt=1184722875997151232

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*