सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकणार : गावडे

सिंधुदुर्ग :

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे जनता यंदासुद्धा मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भगवाच्या साथ देत केसरकर यांना निवडून देणार असल्याचा दावा वेंगुर्ला तालुक्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात महायुती असतानाही भाजपचे बंडखोर राजन तेली त्या पक्षाच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. तर, राष्ट्रवादीने याठिकाणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी दिली आहे. या तिरंगी लढतीत शिवसेना मागच्या निवडणुकीप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*