माणदेशी जनताच घडवणार परिवर्तन : अनुराधा देशमुख

सातारा :

दुष्काळी माण-खटाव भागाच्या विकासासाठी यंदा या विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची हाक देत जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. या भागात विकास करून स्थानिक रोजगार निर्मिती करण्यासाठीच्या भावनेने मतदारांनी यंदा मतदान करण्याचे ठरविले असल्याचा विश्वास ड्रीम फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा देशमुख यांनी कामोठा (मुंबई) येथील मेळाव्यात व्यक्त केला.

अनुराधा देशमुख म्हणाल्या की, उत्तम प्रशासक म्हणुन दोन पंतप्रधानांनी गौरवलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना मतदारांचा प्रतिसाद लक्षात घेता यंदा या भागात नक्कीच बदल होईल असे वाटते. मागील दहा वर्षापुर्वीचे प्रश्न अजूनही कायम आहेत. या दुष्काळी भागाला अभ्यासी नेतृत्वाची गरज आहे. कर्तृत्व व वक्तृत्व असे दोन्ही गुण प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये आहेत. यावेळी आरती बनसोडे, नानासाहेब दोलताडे, धीरज जगताप, विशाल जगताप, सुनिल सूर्यवंशी, नितीन मगर आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*