खटाव गट ठरविणार कोरेगावच्या विजयाची नांदी : विधाते

सातारा :

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून यंदा खटाव तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाची नांदी रचणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते यांनी व्यक्त केला आहे.

पुसेगाव-खटाव येथे आयोजित प्रचार सभेत विधाते यांनी यंदा पुन्हा एकदा कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, अर्जुन भोंडवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सागर साळुंखे, कॉंग्रेस नेते डॉ. सुरेश जाधव, मोहन पाटील, राजेंद्र कचरे, जयदीप शिंदे आदि उपस्थित होते.

भाजपमधून शिवसेना पक्षात प्रवेश करून उमेदवारी करीत असल्याने विरोधी उमेदवार महेश शिंदे यांच्यावर या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्व वक्त्यांनी जोरदार टीका केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*