भाजपचे विकासाचे मॉडेल फेल : मनमोहन सिंग

मुंबई :

भाजपने डबल इंजिनाचे जे विकासाचे मॉडेल मांडले व ते यशस्वी होत असल्याचा दावा केला आहे. तो दावा सपशेल खोटा आहे. त्यांच्या विकासाचे मॉडेल फेल झाल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.

मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलताना सिंग म्हणाले की, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे. तसे निदान करण्यात सध्याचे सरकार कमी पडत आहे. मोदी सरकार लोकाभिमुख धोरणे राबवत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अलीकडची विधाने पाहता त्याचा प्रत्यय येत आहे. एकेकाळी सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आजघडीला देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य झाले आहे. मागील चार वर्षात मंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. एकेकाळी उद्योगक्षेत्राच्यादृष्टीने चैतन्यदायी वातावरण असलेल्या महाराष्ट्र राज्यात रोजगार व नवीन गुंतवणूक संधींचा दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्यातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेकजण बेरोजगारीमुळे स्थलांतर करत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*