माणदेशी धनगर समाज देशमुखांच्या पाठीशी : वीरकर

सातारा :

माण-खटावच्या माजी आमदारांनी धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी खटाटोप करू नये. यंदा अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनाच समाज विधानसभेत पाठविणार आहे. तसे आमचं सगळ्यांचं पक्कं ठरलंय असा टोला मामूशेठ विरकर यांनी भाजपला लगावला आहे.

अपक्ष उमेदवार देशमुख यांना जाहीर पाठींबा देण्याची भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. या भागात या समाजाचे जवळपास 80 हजार मतदान आहे. या एकगठ्ठा मतदानाच्या जीवावर यंदा निवडणुकीचे चित्र बदलणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. म्हसवड येथे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये प्रभाकर देशमुख यांच्यासह अनिल देसाई, दिलीप येळगावकर, मामूशेठ विरकर, बबन विरकर, युवराज बनगर, सतीश मडके, अशोक माने, नानासाहेब डोलताडे, जे.टी पोळ, पृथ्वीराज राजेमाने, बाबासाहेब हुलगे, दादासाहेब शिंगाडे, जालिंदर खरात, बाळासाहेब काळे, दादासाहेब दोरगे, अशोक राजगे, वैशाली विरकर, विक्रम शिंगाडे, सदाशिव बनगर, देविदास मासाळ, सचिन होनमाणे, बाबाराजे हुलगे, मारुती मोठे, विराज गोरड, भास्कर काळे, सुभाष घुटुगडे, अंकुश गारळे, बाळासाहेब मदने, महादेव मासाळ, रामचंद्र झिमल, संजय दिडवाघ, बाबासाहेब माने, बापू बनगर, भारत अनुसे आदी उपस्थित होते. धनगर समाजाबरोबरच वंजारी, दलित, माळी, रामोशी, कैकाडी अशा अठरापगड जातीच्या नेत्यांनी देशमुख यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पराभवाच्या भितीने बिथरलेल्या विरोधकांनी मराठा विरुद्ध धनगर असा वाद पेटवून आपली पोळी भाजण्यासाठीचा प्रयत्न केला. मात्र, या समाजाने विकासाभिमुख उएन्त्रुत्व म्हणून देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांची हवा गुल झाल्याचे यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितले. धनगर समाजातील प्रश्न, त्यांच्या मागण्या, समाजाची संस्कृती याचा विकास करण्याबाबतचे आश्वासन देशमुख यांनी दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*