कोरेगावच्या विकासासाठी सदैव तत्पर : शिंदे

सातारा :

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा व खटाव या तालुक्यांतील गावेही येतात. या सर्व भागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्याच कामाच्या जोरावर यंदा पुन्हा निवडून येण्याचा विश्वास माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे यांच्या विरोधात शिवसेना-भाजपने सहमतीने महेश शिंदे यांना उमेदवारी देत कोरेगावमध्ये परिवर्तनाचा नारा दिला आहे. मात्र, आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीचा उपयोग करीत आक्रमक प्रचाराची त्याला जोड दिली आहे. गावोगावी जाऊन आमदार शिंदे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सर्व समाजघटक व सर्व स्तरातील मतदारांची भेट घेऊन ते पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. एकूणच अनुभवाच्या जोरावर या मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेनेला कसे आव्हान उभे करते, यावर येथील निकालाचे चित्र ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*